Sunday 8 March 2020

उजाळाईवाचे जागृत देवस्थान

       उजाळाईवाडीचे जागृत देवस्थान , श्री आसोबा
    करवीर भूमीला दैदिप्यमान धर्मिक वारसा लाभला आहे. कोल्हापूर शहरापासून जवळच असलेले आपले उजाळाईवाडी गाव. श्री आसोबा आपल्या गावचे ग्रामदैवत याची आख्यायिका अशी                     फार प्राचीन काळी बिरोबा (आसोबा) नावाचा एक वाटसरू फिरत फिरत  उजाळाईवाडी येथील डोंगरावर स्थायिक झाला होता.त्याच दरम्यान कोल्हापूरात १२ वर्षे पाऊस पडलेला नाव नव्हता.कोल्हापूरच्या राजाने सर्व उपाय करून पाहिले पण यश आले नाही.तेव्हा एकाने राजाला उजाळाईवाडी गावात एक असा धनगर(आसोबा) आहे की जो यावर नकी उपाय करू शकेल.तेव्हा राजाच्या शिपायांनी असोबा पकडून राजदरबारात नेले.राजाने सांगितले तू माझ्या राज्यात पाऊस पाडलास तर मी तुला जे मागशील ते देईन.
      राजाच्या या विनंतीला मान देऊन आसोबा टेंबलाई टेकडी येथे आला, सोबत राजा-सरदार सर्व सबिना (हत्ती,घोडे,उंट,सैन्य ) ही होते.आपल्या दैवी सामर्थ्याने मोठा गराचा पाऊस पाडला. हे पाहून राजा खूश झाला. त्याने आसोबाना उजाळाईवाडी येथे ५ एकर शेत जमीन इमानी म्हणून दिली. राजाने ५ फूट उंचीच्या दगडावर चंद्र सूर्य कोरुन एक शिळा या इनामी जमीनित रोवली.ती शिळा आजही आसोबा मंदिर आवारात पहावयास मिळते . पुढे धूळसिद्ध राजाने आपली मुलगी कामाबाई हिचा विवाह आसोबाशी लावून दिला .